पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'मी टु'चे आरोप असलेला अनु मलिक छोट्या पडद्यावर परतणार

अनु मलिक

बॉलिवूडमधील मी टु मोहिमेअर्तंगत  झालेल्या आरोपांमुळे संगीतकार अनु मलिक हा गेल्या कित्येक महिन्यांपासून प्रसिद्धीझोतापासून लांब गेला होता. मात्र आता तो पुन्हा छोट्या पडद्यावर परतणार असल्याचं म्हटलं जात आहे. लैंगिक गैरवर्तणुकीच्या आरोपांनंतर अनु मलिकची  इंडियन आयडलच्या परीक्षक पदावरून गच्छंती करण्यात आली होती. मात्र आता परीक्षक म्हणून अनु मलिकच्या नावाचा पुन्हा एकदा विचार केला जाणार असल्याचं समजत आहे. 

स्पॉटबॉय इनं दिलेल्या माहितीनुसार सोनी  वाहिनी आणि अनु मलिकमध्ये चर्चा  झाली असल्याचं समजत आहे. जर ही चर्चा सकारात्मक झाली तर  अनु मलिक परीक्षक म्हणून पुन्हा  पहायला मिळेल असं म्हटलं जात आहे. गेल्यावर्षी  अनु मलिकवर गायिका श्वेता पंडित आणि सोना महोपात्रा  यादोघींनी मी टु मोहिमेअर्तंगत लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप केले होते.

मी  १५ वर्षांची असताना अनु मलिकनं मला बळजबरीनं त्याचं चुंबन  घेण्याचं सांगितलं होतं असं श्वेतानं आपल्या ट्विटर पोस्टमध्ये म्हटलं होतं. तर गायिका सोना महोपात्राहिनं देखील अनु मलिक आणि कैलास खेर या दोघांचं पितळ उघडं पाडलं होतं. मी टु मोहिमेत नाव आल्यानंतर संबधित वाहिनीनं  अनु मलिकला परीक्षक पदावरून पायउतार होण्यास सांगितलं होतं. मात्र अनुवरचा राग काहीसा क्षमला  असं वाटल्यानं तो पुन्हा एकदा रिअॅलिटी शोमध्ये येण्याची शक्यता आहे.