पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'मी टु' आरोपांमुळे वादात असलेला अनु मलिक टीव्हीवर परतणार

अनु मलिक

मी टु आरोपांमुळे  वादात असलेला संगीतकार अनु मलिक हा गेल्या कित्येक महिन्यांपासून प्रसिद्धीझोतापासून लांब गेला होता. मात्र आता तो पुन्हा छोट्या पडद्यावर परतणार आहे.

बिग बॉस मराठी २ : शिवानीनं वीणा- हिनाला डांबलं अडगळीच्या खोलीत

बॉम्बे टाइम्सच्या वृत्तानुसार 'सुपरस्टार सिंगर' या म्युझिक रिअॅलिटी शोमध्ये तो परतणार असल्याचं म्हटलं जात आहे. यापूर्वी स्पॉटबॉय इनं दिलेल्या माहितीनुसार इंडियन आयडलच्या परीक्षक पदावरही अनु मलिक परतू शकतो असं म्हटलं आहे. लैंगिक गैरवर्तणुकीच्या आरोपांनंतर अनु मलिकची  इंडियन आयडलच्या परीक्षक पदावरून गच्छंती करण्यात आली होती. मात्र आता परीक्षक म्हणून अनु मलिकच्या नावाचा पुन्हा एकदा विचार केला जाणार असल्याची माहिती या वेबसाईटनं दिली. 

चेक बाऊन्स प्रकरण : मला अडकवण्याचा प्रयत्न, कोयनाचा आरोप

गेल्यावर्षी  अनु मलिकवर गायिका श्वेता पंडित आणि सोना महोपात्रा  यादोघींनी मी टु मोहिमेअर्तंगत लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप केले होते. मी  १५ वर्षांची असताना अनु मलिकनं मला बळजबरीनं त्याचं चुंबन  घेण्याचं सांगितलं होतं असं श्वेतानं आपल्या ट्विटर पोस्टमध्ये म्हटलं होतं. तर गायिका सोना महोपात्रा हिनं देखील अनु मलिक आणि कैलास खेर या दोघांचं पितळ उघडं पाडलं होतं. मी टु मोहिमेत नाव आल्यानंतर संबधित वाहिनीनं  अनु मलिकला परीक्षक पदावरून पायउतार होण्यास सांगितलं होतं.