पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

परीक्षक पद सोडलं नाही, विश्रांती घेतोय ; वादावर अनु मलिकचं स्पष्टीकरण

अनु मलिक

लैंगिक गैरवर्तनाच्या आरोपामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या अनु मलिकनं 'इंडियन आयडॉल ११' चं  परीक्षक पद सोडलं असल्याचं समजत आहे. मात्र मी पद सोडलं नसून  तीन आठवड्यांची विश्रांती घेत असल्याची माहिती अनु मलिकनं हिंदुस्थान टाइम्सशी बोलताना दिली. 

'IFFI'त नेत्रहीनांसाठी 'लगे रहो मुन्ना भाई'चे खास शो

'मी इंडियन आयडॉल सोडलं नाही. मी तीन आठवड्यांची विश्रांती घेत आहे. मला या वादातून बाहेर पडायचं आहे, मगच मी या शोमध्ये परतेल. माझ्याविरोधात ट्विटरवर मोहिम सुरू आहे. माझ्याविरोधात केल्या जाणाऱ्या  खोट्या आरोपांमुळे मी आता कंटाळलो आहे. त्यामुळे मी या आरोपांमधून माझं नाव हटवणार आणि मगच परतणार, हेच सर्वांसाठी चांगलं आहे. गेल्या ४२ वर्षांत मी चित्रपटसृष्टीला चांगलं संगीत दिलं आहे. 

लता मंगेशकर यांची प्रकृती ठिक, भाची रचना शहा यांची माहिती

मात्र काही लोक मला उद्धवस्त करण्याचा प्रयत्न करत आहेत. लोक काहीना काही बोलत आहेत पण देव आहे, तो पाहतोय. मी नक्कीच या आरोपांतून स्वत:ला निर्दोष सिद्ध करेन. लोकांच्या चुकीच्या आरोपांमुळे माझं नाव खराब झालं आहे, माझी शांतता, सर्जनशीलता सर्वच भंग पावली आहे. हे गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू आहे. मात्र हे थांबवायलाच हवं, मला हे सगळं थांबवायचं आहे.' अशी प्रतिक्रिया अनु मलिकनं  हिंदुस्थान टाइम्सला दिली.