पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

इंडियन आयडॉलमधून अनु मलिकचे बाहेर पडणे हा माझा विजय: सोना महोपात्रा

सोना महापात्रा आणि अनु मलिक

लैंगिक गैरवर्तनाच्या आरोपामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या अनु मलिकनं 'इंडियन आयडॉल ११' चं  परीक्षक पद सोडले. हे लैंगिक छळाला बळी पडलेल्या महिलांसाठी विजय असल्याचे बॉलिवूडची गायिकासोना महोपात्राने सांगितले आहे. एका मुलाखती दरम्यान सोना महापात्राने ही प्रतिक्रिया दिली आहे. अनु मलिकचे शोबाहेर पडणे ही चांगली बातमी असल्याचे तिने सांगितले आहे. 

अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडितेला शाहरुखनं दिल्या लग्नाच्या शुभेच्छा

सोना महोपात्राने सांगितले की, 'ही चांगली बातमी आहे. सोनी टिव्हीने हा निर्णय घेण्यास खूप उशिर केला. मात्र मला खूप आनंद झाला की अखेर अनु मलिकला शोमधून बाहेर काढले. ही संपूर्ण देशाची लढाई आहे. असे बरेच लोक आहेत ज्यांना अनु मलिकला नॅशनल टेलिव्हिजनवर पहायचे नाही. कारण ते (अनु मलिक) लोकांना चुकीचा संदेश देत होते की तेही असे करुन वाचू शकतात.'

...म्हणून भूमिलाच दिली संधी, टीकांवर दिग्दर्शकाचं स्पष्टीकरण

सोना महोपात्राने पुढे असे सांगितले की, 'मी प्रामाणिकपणा आणि न्यायासाठी लढा देत होते. आता ही बातमी ऐकून मला असे वाटत आहे की हा सर्वांचा विजय आहे. फक्त माझाच नाही तर ज्या महिलांसोबत गैरवर्तन झाले आहे त्याचा हा विजय आहे. आमचा लढा अजून संपलेली नाही. ही सुरुवात आहे. आम्ही शांत बसणारे नाही.'

सायली सांगणार 'गोष्ट एका पैठणीची'