पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अनु मलिकनं सोडलं 'इंडियन आयडॉल ११' चं परीक्षक पद

अनु मलिक

 लैंगिक गैरवर्तनाच्या आरोपामुळे गेल्या कित्येक दिवसांपासून टिकेचा धनी ठरलेल्या गायक अनु मलिकनं अखेर  'इंडियन आयडॉल ११' चं  परीक्षक पद सोडलं असल्याचं समजत आहे. २०१८ साली आलेल्या  मी टुच्या वादळात अनु मलिकचं नावही होतं. सोना महोपात्रासह अनेकींनी  अनु मलिकवर गंभीर आरोप केले होते. या आरोपांमुळे सोनी वाहिनीनं 'इंडियन आयडॉल' च्या  परीक्षक पदावरून अनु मलिकला हटवलं होतं. मात्र नव्या सिझनमध्ये अनु मलिकला पुन्हा परीक्षकाच्या पदावर बसवल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. 

'तान्हाजी' मराठीतही होणार डब, अजयने मानले अमेय खोपकर आणि मनसेचे आभार

लैंगिक गैरवर्तनासारखे आरोप असलेल्या  माणसाला सोनी वाहिनीनं पुन्हा संधी दिल्याबद्दल वाहिनीच्या भूमिकेविषयी वारंवार सोनासह अनेक महिलांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले  होते. हे प्रकरण सोशल मीडियावर खूपच चिघळल्यानंतर 'इंडियन आयडॉल ११' चे परीक्षक पद अनुनं सोडलं असल्याची माहिती  वाहिनीच्या काही सुत्रांनी आयएएनएस वृत्तसंस्थेला दिली. 

'तान्हाजी'च्या दिग्दर्शकाला जितेंद्र आव्हाडांचा धमकीवजा इशारा

 अनु मलिकनं परीक्षक पद सोडलं आहे, मात्र त्याच्याजागी कोणाची परीक्षक म्हणून निवड होईल हे अद्यापही ठरलं नाही.