पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'नच बलिये'साठी अनिता हसनंदानीला सर्वाधिक मानधन?

अनिता हसनंदानी

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध रिअॅलिटी शोपैकी एक असलेल्या 'नच बलिये'च्या नव्या सिझनची निर्मिती सलमान खान करत आहे. या शोच्या मूळ संकल्पनेत मोठा बदल करण्याचा निर्णय सलमाननं  घेतला. 'नच बलिये'मध्ये खऱ्या आयुष्यातील जोडपी सहभागी होतात. मात्र या सिझनमध्ये आता पूर्वाश्रमीच्या जोड्यादेखील पहायला मिळणार आहेत. यात छोट्या पडद्यावरील अभिनेत्री अनिता हसनंदानी देखील असणार आहे. शोमध्ये येण्यासाठी अनितानं इतर स्पर्धकांपेक्षाही सर्वाधिक मानधन घेतलं असल्याचं म्हटलं जात आहे.

फसवणुकीच्या आरोपांवर सोनाक्षीचं ट्विटरवर स्पष्टीकरण

'नच बलिये ८' साठीही अनिताला विचारण्यात आलं होतं. मात्र अनितानं त्यास नकार दिला होता. मात्र यावेळी शोच्या निर्मात्यांनी अनिताला चांगलं मानधन दिलं असल्याचं पिंक व्हिलानं म्हटलं आहे. मानधनाचा आकडा अनिताही नाकारू शकली नाही. त्यामुळे नच बलियेच्या नवव्या सिझनमध्ये अनिता दिसणार आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#nachbaliye9 Excited mein edddaaa @star.aniljha 💫 @starplus @banijayasia

A post shared by Anita H Reddy (@anitahassanandani) on

एकता कपूरच्या अनेक मालिकांमध्ये अनिता प्रमुख भूमिकेत होती. ती छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनितानं चित्रपटातही काम केलं आहे. 'नागिन' या मालिकेमुळे अनिताच्या लोकप्रियतेत कमालीची वाढ झाली आहे.