पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'अंधाधूननं मला कलाकार म्हणून घडवलं'

अंधाधून

आयुष्मान खुराना, तब्बू, राधिका आपटेची प्रमुख भूमिका असलेला 'अंधाधून' चित्रपट २०१८ मधला सुपरहिट चित्रपट ठरला. हा चित्रपट प्रदर्शित होऊन एक वर्ष पूर्ण झालं आहे. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. याव्यतिरिक्त  अनेक पुरस्कार या चित्रपटाच्या नावे झाले. 

'अंधाधून हा माझ्या करिअरमधला सर्वोत्तम चित्रपट ठरला. एक अभिनेता म्हणून चित्रपटानं मला सर्वार्थानं घडवलं, मी नेहमीचं आव्हानात्मक भूमिकांच्या शोधात असतो. कलाकार म्हणून  मला घडवणाऱ्या, नवं काहीतरी शिकवणाऱ्या भूमिका मला स्वीकारायला आवडतात अंधाधुन हा त्यापैकी एक चित्रपट आहे, या चित्रपटामुळे मी परिपूर्ण कलाकार झालो', अशा शब्दात आयुष्माननं आपल्या भावना व्यक्त केल्या. 

Video : सेटवर बेशुद्ध पडलेल्या व्यक्तीला अक्षयनं वाचवलं

'चित्रपटाचे दिग्दर्शक श्रीराम राघवन यांनी अंधाधूनसाठी माझा विचार केला, माझ्यावर विश्वास ठेवला यासाठी मी नेहमीच त्यांचा ऋणी राहिल', अशा शब्दात आयुष्मान खुरानानं श्रीराम राघवन यांचे आभार मानले. 

भारतात प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभल्यानंतर हा चित्रपट चीनमध्ये आणि दक्षिण कोरियातही प्रदर्शित करण्यात आला. चीनमध्ये या चित्रपटानं ३०० कोटींहून अधिकची कमाई केली. 

कापलेली झाडे पुन्हा लावणार का ?, अभिनेत्री सईचा हल्लाबोल