पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'सुपर ३०' लवकर प्रदर्शित व्हावा, आनंद कुमार यांची होती इच्छा

आनंद कुमार

गरीब मुलांना आयआयटीसाठी मोफत शिक्षण देणाऱ्या आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित 'सुपर ३०' चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात हृतिक रोशन प्रमुख भूमिकेत आहे. हा चित्रपट लवकरात लवकर प्रदर्शित व्हावा अशी आनंद कुमार यांची इच्छा होती. यामागे कारणही तसंच होतं. आनंद यांना ब्रेन ट्युमरचं निदान झालं होतं म्हणूनच त्यांचा बायोपिक हा ते जिवंत असतानाच प्रदर्शित व्हावा अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती.

मृत्यू कधी तुमच्या दारावर उभा ठाकेन याची कल्पना तुम्हालाही नसते. हा चित्रपट मी हयातीत असतानाच व्हावा अशी माझी इच्छा होती. चित्रपटात माझा प्रवास दाखवताना कोणतीही चूक होऊ नये म्हणून मी जवळपास १३ ते १४ वेळा चित्रपटाची स्क्रीप्ट वाचली असंही ते म्हणाले.

आणि काय हवं : येतेय प्रिया- उमेशची नवी कोरी वेबसीरिज

२०१४ मध्ये मला उजव्या कानानं ऐकू येणं बंद झालं. मी यावर पाटनामध्ये अनेकदा उपचार घेतले. मी जवळपास ८० ते ९० % श्रवणशक्ती गामावून बसलो होतो. मात्र दिल्लीत उपचार घेत असताना मला ब्रेन ट्युमरचं निदान झालं. हा ट्युमर वाढतच गेला होता. सध्या ट्युमरवर उपचार सुरू आहेत, असंही आनंद कुमार यांनी सांगितलं.

दिशानं मालिकेत परतावं, जेठालालची इच्छा

'मी दिलेलं योगदान  योग्य पद्धतीनं लोकांपर्यंत पोहोचावं असं मला मनापासून वाटत होतं. हृतिकच माझ्या भूमिकेस न्याय देऊ शकतो असा माझा ठाम विश्वास होता.' असंही कौतुक आनंद यांनी केलं. आनंद कुमार यांचा बायोपिक 'सुपर ३०' हा १२ जुलैला प्रदर्शित झाला.