पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अमृताला या विशेष कारणासाठी दीपिकासोबत करायचंय काम

अमृता सुभाष

मराठीबरोबरच हिंदीत आपल्या अभिनयानं वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री अमृता सुभाष नुकतीच सेक्रेड गेम्स २ मध्ये दिसली. सेक्रेड गेम्स २ मध्ये अमृतानं  रॉ एजेंट कुसुम देवी यादवची भूमिका साकारली. अमृतानं आतापर्यंत साकारलेल्या अनेक भूमिकांपैकी ही भूमिका वेगळी ठरली आहे.

अभिनयाबरोबर अमृताला गाण्याची आणि लिहिण्याची देखील आवड आहे. व्यग्र वेळापत्रकामुळे या दोन्ही गोष्टीकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. मात्र आता वेळापत्रकातून गाण्यासाठी आणि लिखाणासाठी वेळ द्यायचा आहे असं अमृता म्हणाली.

'भूल भुलैया २' मध्ये कार्तिकसोबत अक्षयही दिसणार, दिग्दर्शकांचा दुजोरा

अमृता एका वृत्तपत्रात मानसिक आरोग्यावर स्तंभलेखन  करत आहे. तिनं मानसिक आरोग्यावर पुस्तकही लिहिलं आहे. अमृताला अभिनेत्री दीपिका पादुकोनसोबत मिळून कामही करायचं आहे. मानसिक आरोग्यावर दीपिका खुलेपणानं येऊन बोलली आहे. दीपिकाची स्वस्त:ची  संस्था देखील आहे. नैराश्यानं ग्रासलेल्या, तणावाच्या गर्तेत असलेल्या अनेकांना यातून बाहेर काढण्याचं काम दीपिकाची संस्था करते. 

आलियाची अवस्था 'तेलही गेले, तूपही गेले..' सारखी

त्यामुळे मला तिच्यासोबत मानसिक आरोग्याविषयी जनजागृती करण्याच्या चांगल्या कार्यात हातभार लावायचा आहे असंही अमृतानं सांगितलं.