पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'खतरो के खिलाडी'मध्ये जाण्यापूर्वी आईचा अमृताला हा मोलाचा सल्ला

अमृता खानविलकर

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर ही  'खतरो के खिलाडी'च्या दहाव्या सिझनमध्ये सहभागी होत आहे. अमृता सध्या बल्गेरियामध्ये आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात 'खतरो के खिलाडी'चे स्पर्धक बल्गेरियामध्ये पोहोचले. या साहसी शोमध्ये सहभागी होण्यापूर्वी अमृतानं प्रशिक्षणही घेतलं आहे. हा शो त्यातील कठीण स्टंटसाठी ओळखला जातो. प्रत्येक खेडाळूला यातील स्टंट पूर्ण करणं हे अनिवार्य असतं. या शोमध्ये सहभागी होण्यापूर्वी अमृतानं काही दिवसांचं विशेष प्रशिक्षणही घेतलं आहे. या शोमध्ये सहभागी होताना प्रशिक्षणासोबतच आईचा  मोलाचा सल्लाही उपयोगी पडणार आहे असं  अमृता म्हणाली. 

महाराष्ट्रातल्या पूरग्रस्तांसाठी बॉलिवूड कलाकारांची मदत का नाही? मनसे चित्रपट अध्यक्ष अमेय खोपकर यांचा सवाल

घाई गडबडती कोणतेही चुकीचे निर्णय घेऊ नकोस प्रत्येक क्षणाचा आनंद घे असा सल्ला आईनं आपल्याला दिल्याचं अमृता म्हणाली. अमृताची आई गौरी या अमृताच्या मॅनेजर देखील आहेत. बल्गेरियाला निघण्यापूर्वी आईसोबत तासभर मी चर्चा केली.  आयुष्यात बऱ्याच गोष्टी अजूनही मला पहायच्या आहेत, एक माणूस म्हणून आपण एकमेकांशी कसं वागलं पाहिजे हे तिनंच मला समजावून सांगितलं, हा खेळ खेळताना तिनं दिलेल्या सल्ल्याची, शिकवणुकीची मला खूपच मदत होणार आहे. तिनं मला नवी उर्जा, ताकद दिली आहे, असं अमृता म्हणाली. 

अभिनेत्री श्वेता तिवारीची पतीविरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रार

तर पती हिंमाशूवनंही मोलाचा सल्ला दिला. जी गोष्ट केल्यानं तुला दु:ख होईन आणि आयुष्यभर जी गोष्ट मनाला खुपत राहिन ती कधीही करू नको असा सल्ला पतीनं दिल्याचं अमृतानं सांगितलं.