पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अमिताभ बच्चन यांचे ट्विटर हँडल हॅक, पण अर्धा तासात पूर्ववत ताबा

अमिताभ बच्चन

हिंदी चित्रपटसृष्टीतील महान अभिनेते अमिताभ बच्चन यांचे ट्विटर हँडल सोमवारी रात्री हॅक करण्यात आले. तुर्कीश हॅकर ग्रुपच्या अयिलदिज तिमने हे कृत्य केल्याचे म्हटले आहे. या घटनेनंतर अर्धा तासात पुन्हा एकदा अमिताभ बच्चन यांचे हँडल पूर्ववत करण्यात यश आले. पण हा विषय सोशल मीडियात चर्चेत आला. अनेकांनी व्हॉट्सऍपच्या माध्यमातून याची माहिती एकमेकांना दिली. 

ट्विटर हँडल हॅक केल्यानंतर हॅकर्सनी त्यांचा प्रोफाईल फोटो बदलून तिथे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा फोटो लावला. त्याचबरोबर त्यांच्या हँडलवरील माहितीमध्येही फेरफार करण्यात आला. माहितीमध्ये Love Pakistan असे लिहिण्यात आले. हे प्रकरण मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडे देण्यात आले असून, ते तपास करीत आहेत, असे मुंबई पोलिसांच्या प्रवक्त्याने 'पीटीआय'ला सांगितले.

बिस बॉस मराठी २ : या कारणामुळे सर्व सदस्यांना मिळणार शिक्षा

अमिताभ बच्चन यांच्या ट्विटर हँडलचा कव्हर फोटोही बदलण्यात आला. या ठिकाणी या ग्रुपचा लोगो ठेवण्यात आला. या हँडलवरून करण्यात आलेल्या ट्विटमध्ये तुर्कीश फूटबॉलपटूंना आईसलँडने दिलेल्या वागणुकीचा निषेध करण्यात आला. आम्ही शांतपणे आमचा मुद्दा मांडत असलो, तरी आम्ही मोठा सायबर हल्ला घडवून आणू शकतो, असे या ट्विटमध्ये लिहिण्यात आले होते. संपूर्ण जगाचे लक्ष या ट्विटच्या माध्यमातून वेधून घेण्यात आले. 

हँकर्सच्या या ग्रुपने यापूर्वी ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर आणि अभिनेता शाहिद कपूर यांचेही ट्विटर हँडल हॅक केले होते.