पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजारी असल्यानं बच्चन अनुपस्थित, २९ डिसेंबरला करणार पुरस्कार प्रदान

अमिताभ बच्चन

 ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन आजारी असल्यानं राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारास अनुपस्थित राहिले. चित्रपट क्षेत्रात मानाचा समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार त्यांना जाहीर झाला. मात्र दिल्लीत पार पडलेल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्यात बच्चन उपस्थित राहू शकले नाही, त्यामुळे २९ डिसेंबरला त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती  'माहिती व प्रसारणमंत्री' प्रकाश जावडेकर यांनी दिली. 

गूड न्यूज : मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेसाठी या गायकाला होती पहिली पसंती

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी यांनी राष्ट्रपती भवनात पुरस्कार विजेत्या कलाकारांसाठी  चहापान कार्यक्रमाचं आयोजन केले आहे,  त्यावेळी  बच्चन यांचा दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येईल असंही जावडेकर म्हणाले. सूवर्णकमळ, शाल आणि १० लाख रोख असं पुरस्काराचं स्वरूप आहे. 

बच्चन यांची प्रकृती ठीक नव्हती. त्यांना ताप आला होता. प्रकृती  खालावलेली  असल्यानं त्यांना प्रवास करण्यास डॉक्टरांनी मज्जाव केला होता, म्हणूनच आज पार पडलेल्या  राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यास बच्चन उपस्थित नव्हते. 

स्मृतिदिन विशेष : 'आनंदयात्री सर्वांना रुखरुख लावून कायमचा निघून गेला'