पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विक्रम गोखले- बिग बींच्या मराठी चित्रटाचं पहिलं पोस्टर पाहिलंत का?

एबी आणि सीडी

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे तब्बल २५ वर्षांनंतर मराठी चित्रपटात काम करत आहे. त्यामुळे बिग बींच्या मराठी प्रेक्षकांना या चित्रपटाबाबत कमालीची उत्सुकता होती. चित्रपटाचं नाव 'एबी आणि सीडी' असून या चित्रपटाचं पहिलं पोस्टर नुकतंच लाँच करण्यात आलं आहे.

माझी विद्यार्थिंनी आज सुपरस्टार, शिक्षिकेचं दीपिकाला भावनिक पत्र

या पोस्टरमध्ये  मराठी चित्रपट आणि रंगभूमीवरचे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले हे अमिताभ बच्चन यांच्या वेशात दिसत आहेत. 'याराना' चित्रपटातील 'सारा जमाना' या गाण्यात बच्चन यांनी जशी वेशभूषा केली तशाच वेशात विक्रम गोखले आहेत त्यामुळे चाहत्यांना चित्रपटाबद्दल अधिक कुतूहल आहे. 

कॉफीचं बिल ७८, ६५०/- तरीही किकूची तक्रार नाही, कारणही तितकंच मजेशीर

अभिताभ बच्चन यांची चित्रपटातील भूमिका ही १५ मिनिटांची आहे. ते बच्चन म्हणूनच या चित्रपटात दिसणार आहे असं निर्माते अक्षय बर्दापूरकर म्हणाले. या चित्रपटात विक्रम गोखले मुख्य भूमिकेत आहेत. त्यामुळे 'अग्निपथ'नंतर आता पुन्हा एकदा हे दोन दिग्गज पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धूरा मिलिंद लेले यांनी सांभाळली आहे.