पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मेट्रोला पाठिंबा देणाऱ्या बच्चन यांच्याविरोधात नाराजीचे सूर

अमिताभ बच्चन

मुंबई मेट्रोला पाठिंबा देणाऱ्या बच्चन यांच्याविरोधात सोशल मीडियावर नाराजीचे सूर उमटत आहेत. एकीकडे मेट्रोच्या आरे कारशेडसाठी हजारो झाडांची कत्तल केली जाणार आहे त्यामुळे  मेट्रो कारशेडविरोधात मुंबईकरांमध्ये तीव्र नाराजी आहे. यावरून वाद सुरू असताना बच्चन यांनी केलेल्या ट्विटनं साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्यांनी मुंबई मेट्रोचा पर्याय उत्तम असल्याचं आपल्या ट्विटमधून सुचवलं होतं. 

 निर्माते अशोक पंडित यांनी बच्चन यांना खडे बोल सुनावले आहेत. आम्ही आरेचं जंगल वाचवण्यासाठी लढा देतोय. मला फक्त इतकंच जाणून घ्यायचं आहे की तुमचं ट्विट हे खरंच मेट्रोला पांठिबा देणारं आहे का? जर कारशेडसाठी दुसरा पर्याय उपलब्ध असताना २७०० वृक्षांची कत्तल करणं खरंच आवश्यक आहे का? असा सवाल त्यांनी केला आहे. तर दुसरीकडे बुधवारी काही समाजसेवकांनी बच्चन यांच्या बंगल्यासमोर निदर्शनंही केली होती. 

मेट्रो बांधकाम परिसरात अभिनेत्रीच्या गाडीवर दगड कोसळला

'माझ्या एका मित्राला तातडीनं वैद्यकीय मदत हवी होती. मात्र गाडीनं जाण्याऐवजी त्यानं मेट्रोचा पर्याय निवडला. तो मेट्रोच्या सेवेपासून खूपच खूश होता. त्यानं मला असं सांगितलं की मेट्रो ही अत्यंत जलद, अधिक कार्यक्षम आणि सुलभ आहे. प्रदूषणावर मेट्रोचा पर्याय चांगला आहे. ' असं ट्विट बच्चन यांनी केलं होतं. तर दुसरीकडे जास्तीत जास्त झाडं लावण्याचा संदेशही त्यांनी दिला आहे. 'मी माझ्या  बागेत अनेक झाडं लावली आहेत. तुम्ही  झाडं लावलीत का?' असंही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं.

बच्चन यांचं ट्विट अप्रत्यक्षरित्या कारशेडला पाठिंबा देणारं आहे असं अनेकांचं म्हणणं होतं. त्यामुळेच बच्चन यांच्याविरोधात नाराजीचे सूर सोशल मीडियावर पाहायला मिळाले.

कपिल शर्मा शोमध्ये परतणार? सुनील म्हणतो...