पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मेट्रो हा उत्तम आणि जलद पर्याय : अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन

मुंबईतील आरेमधील मेट्रो कारशेडसाठी केल्या जाणाऱ्या वृक्षतोडीवर सध्या वाद सुरू आहे. पुढील सुनावणी होईपर्यंत वृक्षतोड केली जाऊ नये असे तोंडी निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने मेट्रो प्रशासनाला दिले आहेत. हा वाद सुरू असताना बच्चन यांनी केलेलं ट्विट सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

हॉलिवूड दिग्दर्शकाच्या सेटसमोर भारतीयाचा आत्महत्येचा प्रयत्न

आपल्या ट्विटमध्ये बच्चन यांनी मेट्रोचे फायदे सांगितले आहेत.  'माझ्या एका मित्राला तातडीनं वैद्यकीय मदत हवी होती. मात्र गाडीनं जाण्याऐवजी त्यानं मेट्रोचा पर्याय निवडला. तो मेट्रोच्या सेवेपासून खूपच खूश होता. त्यानं मला असं सांगितलं की मेट्रो ही अत्यंत जलद, अधिक कार्यक्षम आणि सुलभ आहे. प्रदूषणावर मेट्रोचा पर्याय चांगला आहे. ' असं ट्विट बच्चन यांनी केलं होतं.

Mann Bairagi poster : पंतप्रधान मोदींवरच्या चित्रपटाची खास झलक

तर दुसरीकडे जास्तीत जास्त झाडं लावण्याचा संदेशही त्यांनी दिला आहे. 'मी माझ्या  बागेत अनेक झाडं लावली आहेत. तुम्ही  झाडं लावलीत का?', असा सवालही त्यांनी केला आहे. केवळ झाडे लावा असं म्हणून प्रत्यक्षात काहीच न करणाऱ्यांना त्यांनी टोला लगावला आहे.