पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बच्चन यांचे पहिलेच फोटोशूटच पाहिले का?

अमिताभ बच्चन

 बॉलिवूडचे महानायक अभिताभ बच्चन हे सोशल मीडियावर सर्वाधिक सक्रिय असतात. अनेकदा ते आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जुने फोटो प्रेक्षकांच्या भेटीला आणतात. यावेळी बच्चन यांनी आपल्या पहिल्या वहिल्या फोटोशूटची झलक प्रेक्षकांसोबत शेअर केली आहे. 

सलमानकडून २५ हजार गरजूंच्या खात्यात ६ हजार रुपये

कलाकाराचं फोटोशूट हे नेहमीच चर्चेत असतं, बच्चन यांनी १९६९ साली चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं होतं, त्यावेळी एका मासिकासाठी त्यांनी हे फोटोशूट केलं होतं. बच्चन यांनी आपल्या सोशल मीडियावर त्या फोटोशूटचा फोटो शेअर करुन जुनी आठवण जागवली आहे. 

'हा माझ्या सर्वात पहिल्या फोटोशूटमधला फोटो आहे, १९६९ सालचा हा फोटो आहे, मी  स्टार अँड स्टाइल या त्याकाळच्या आघाडीच्या मासिकासाठी फोटोशूट केलं होते. मी अतिशय लाजरा बुजरा होतो मी स्टारही नव्हतो आणि माझ्याजवळ स्टाइलही नव्हती, मात्र मासिकाची पत्रकार देवयानीला मात्र त्यात दोन्ही दिसत होते', असं बच्चन यांनी लिहिलं आहे. बच्चन यांची पोस्ट सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे.

शाहरूखकडून राज्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी २५ हजार PPE किट्स