पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

या अभिनेत्रीला ओळखलंत का? बीग बिंनी शेअर केला throwback फोटो

करिना कपूर

अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर बरेच सक्रिय असतात. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर ते अनेकदा कविता किंवा जुने फोटो शेअर करतात.  काहीवेळा जुन्या आठवणींना उजाळा देतात.  बच्चन यांनी नुकताच एक कृष्णधवल फोटो शेअर केला आहे. या फोटोमधल्या चिमुकलीला  तुम्ही ओळखलंत  का असं त्यांनी विचारलं आहे?

आपल्या इन्स्टाग्राम  अकाऊंटवर हा फोटो शेअर करत या फोटोमागची गोष्ट सांगितली आहे. हा फोटो करिना कपूरचा आहे. गोव्यात पुकार चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होतं त्यावेळीचा हा फोटो असल्याचं बच्चन यांनी इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं आहे. करिना वडील रणधीर कपूर यांच्यासोबत सेटवर आली  होती. मात्र  तिच्या पायाला  जखम झाली. त्यावेळी बच्चन यांनी मलमपट्टी केली होती. हा प्रसंग कोणीतरी कॅमेरात टीपला होता. बच्चन  यांनी हाच जुना फोटो शेअर करून त्यामागचा किस्सा सांगितला आहे.

अमिताभ बच्चन हे अनेकदा जुने फोटो शेअर करतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी १९ व्या फिल्म फेअर पुरस्कार सोहळ्यातील जुने फोटो  शेअर केले होते. या सोहळ्यात सुपरस्टार राजेश खन्ना यांनी 'आनंद' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जिंकला होता. आनंद चित्रपटाला ४७ वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्तानं त्यांनी हा फोटो शेअर केला होता.

अमिताभ बच्चन सध्या 'चेहरे' या चित्रपटात  व्यग्र आहेत. इम्रान हाश्मी या चित्रपटात त्यांचा सहकलाकार असणार आहे. याशिवाय ते शूजित सरकारच्या चित्रपटातही दिसणार आहेत.