पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अमिताभ बच्चन यांच्या 'झुंड'ची पहिली झलक समोर

झुंड

मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या  बहुचर्चित 'झुंड' चित्रपटाची पहिली झलक सोशल मीडियावर शेअर करण्यात आली. या चित्रपटाचा पोस्टर चर्चेचा विषय  ठरला. आजूबाजूला झोपडपट्टी आणि त्याच्या मधोमध असलेल्या  फुटबॉलकडे मोठ्या आशेनं  पाहणाऱ्या बच्चन यांचं पोस्टर अनेकांना भावलं.

‘काळ’ ठरणार रशियामध्ये प्रदर्शित होणारा पहिला मराठी चित्रपट

'सैराट', 'फँड्री', 'नाळ' सारखे सुपरहिट चित्रपट मराठी प्रेक्षकांना दिल्यानंतर आता मंजुळेच्या 'झुंड'कडून प्रेक्षकांच्या खूप  अपेक्षा आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या निमित्तानं नागराज आणि अमिताभ बच्चन हे दोन मोठे दिग्गज एकत्र काम करत आहेत. नागराज मंजुळे यांचा ‘झुंड’ हा पहिला हिंदी चित्रपट आहे.

‘झुंड’ हा चित्रपट  झोपडपट्टीतील मुलांना फुटबॉलचे प्रशिक्षण देणाऱ्या विजय बरसे यांच्या आयुष्यावर आधारित आहे. महाराष्ट्रातल्या अनेक गावांत या चित्रपटचं चित्रीकरण सुरु होतं. चित्रपटाचं बहुतांश चित्रीकरण हे नागपूरमध्ये पार पडलं. २१ जानेवारीला या चित्रपटाचा पहिला टीझर प्रदर्शित होत आहे. 

VIDEO :'पिरमाचा इस्कोट की किडनीचा घोळ.?, विकून टाक'चा धमाकेदार ट्रेलर