पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

प्रकृतीत सुधारणा, बिग बी पुन्हा 'केबीसी'च्या सेटवर

बिग बी पुन्हा 'केबीसी'च्या सेटवर

गेल्या आठवड्यात प्रकृतीच्या कारणामुळे अमिताभ बच्चन मुंबईतल्या नानावटी रुग्णालयात भरती होते. तीन दिवसांच्या उपचारानंतर बिग बी घरी  परतले. त्यांना काही काळ विश्रांतीचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. काही दिवसांची विश्रांती घेऊन बच्चन आता केबीसीच्या चित्रीकरणासाठी पुन्हा सेटवर रुजू झाले आहेत. 

'हिरकरणी'साठी मनसेचा पुन्हा 'खळखट्याक'चा इशारा

अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर सेटवरचा  फोटो शेअर केला आहे. केबीसीच्या कर्मवीर भागासाठी विशेष चित्रीकरण करण्यात आलं आहे. या चित्रीकरणासाठी क्रिकेटर विरेंद्र सेहवाग,  भारताची आघाडीची धावपटू द्युती चंद, भारतीय वेगवान धावपटू हिमा दास उपस्थित होत्या.

 दबंग ३ : सई मांजरेकरची धमाकेदार एण्ट्री

या तिघांची उपस्थिती असलेला कर्मवीर विशेष भाग लवकरच प्रदर्शित होणार आहे. दर आठवड्याला आपल्या अमुल्य कामगिरीनं भारताची मान उंचावणाऱ्या, समाज कल्याणासाठी योगदान देणाऱ्या 'कर्मवीरां'चा 'कौन बनेगा करोडपती'च्या विशेष भागात सन्मान करण्यात येतो.