पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अमिताभ बच्चन यांनी सलग १८ तास केलं 'केबीसी'चं चित्रीकरण

अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन यांना प्रकृतीच्या कारणावरून डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला आहे. बच्चन हे सध्या 'कौन बनेगा करोडपती' या लोकप्रिय कार्यक्रमाचं चित्रीकरण करत आहेत. त्यामुळे बच्चन यांचं वेळापत्रक हे नेहमीच व्यग्र असतं. बच्चन यांनी नुकतंच तब्बल १८ तास  'केबीसी'साठी चित्रीकरण केलं.

लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर, कुटुंबीयांची माहिती

बच्चन यांनी एकाच दिवसांत ३ एपिसोडचं चित्रीकरण  पूर्ण केलं आहे. कदाचित बच्चन हे काही दिवसांसाठी विश्रांती घेणार असल्याचंही म्हटलं जात आहे. ऑक्टोबर महिन्यात प्रकृतीच्या कारणावरून बच्चन यांना मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 

आमिर खाननं वाढदिवशी जूहीला दिली होती आठवणीत राहण्याजोगी भेट

तब्येत ठिक झाल्यानंतर लगेचच ते 'केबीसी'च्या सेटवर परतले होते.  केबीसी हा छोट्या पडदयावरचा लोकप्रिय कार्यक्रम असून बच्चन आपल्या खास अंदाजात या शोचं सुत्रसंचालन करतात. मात्र महिन्याभरापूर्वी तब्येत बिघडली असल्यानं डॉक्टरांनी त्यांना कामातून दीर्घ विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता.