पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Gulabo Sitabo : नव्या लूकमध्ये बिग बींना ओळखणंही अवघड

गुलाबो सित्तबो

अमिताभ बच्चन सध्या त्यांच्या आगमी चित्रपट 'गुलाबो सित्तबो'मध्ये व्यग्र आहेत. लखनऊमध्ये या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू आहे. या चित्रपटातील बच्चन यांचा पहिला लूक प्रदर्शित झाला आहे, ज्यात बच्चन यांना ओळखणं जवळपास अवघड झालं आहे. यापूर्वी 'पा' चित्रपटासाठी बच्चन यांचा गेटअप पूर्णपणे बदलण्यात आला होता त्यानंतर बऱ्याच वर्षांनी बच्चन हे वेगळ्या रूपात दिसत आहेत. बच्चन यांचं आगळंवेगळं रुप पाहून फॅनही आश्चर्यचकित झाले आहेत. 

सूजित सरकार या  चित्रपटाचं दिग्दर्शन करणार असून या चित्रपटात आयुष्मान खुराना प्रमुख भूमिकेत आहे. आयुष्मान आणि बिग बी पहिल्यांदा एकत्र काम करत आहेत. 'गुलाबो सित्तबो'मध्ये बच्चन  लखनऊमधल्या एका घरमालकाच्या भूमिकेत असल्याचं समजत आहे. 

'चित्रपटाला होकार देण्यापूर्वी मी माझ्या  लूकचे काही स्केचेस पाहिले होते. मला ते खूपच आव्हानात्मक वाटले. नवीन काहीतरी करून पाहायला काय हरकत आहे असा विचार करून ही भूमिका स्वीकारली. चित्रीकरणासाठी मला तासन् तास् मेकअप करावा लागतो.' यासाठी परदेशातून काही मेकअप आर्टिस्ट आले असल्याचंही बच्चन मुंबई मिररला दिलेल्या एका मुलाखतीत  म्हणाले.