पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

...म्हणून वहिदा रहमान आहेत बिग बींचं प्रेरणास्थान

अभिताभ बच्चन- वहिदा रहमान

अमिताभ बच्चन हे बॉलिवूडमधलं मोठं नाव. आज बॉलिवूडमधले असंख्य कलाकार बिग बींना प्रेरणास्थान मानतात. त्यांचे जगभरात लाखो चाहते आहेत. मात्र बिग बींच प्रेरणास्थान आहेत वहिदा रहमान. 

फॅट टु फिट, साराचा फोटो पाहून तुम्हालाही बसेन आश्चर्याचा धक्का

नुकताच बच्चन यांनी वहिदा रहमान यांच्यासोबत  काम करताना आलेला अनुभव चाहत्यांसोबत शेअर केला. रेश्मा और शेरा चित्रपटादरम्यान मला पहिल्यांदा वहिदा यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटाचं चित्रीकरण वाळवंटात सुरू होतं. यातल्या एका दृश्यात वहिदा आणि सुनील दत्त हे उघड्या पायानं वाळवंटात बसले होते. वाळू तापली होती. तापमान खूप जास्त होतं. आमच्या पायात चप्पला होत्या. तरीदेखील गरम वाळूत आम्हाला उभं राहता येत नव्हतं. मात्र अशा प्रतिकूल परिस्थितीत तक्रार न करता वहिदाजी काम करत होत्या. चित्रीकरण झाल्यानंतर दिग्दर्शकांनी ब्रेक घेतला. त्यावेळी क्षणाचा विलंबही न करता मी चप्पला घेऊन त्यांच्याजवळ धावत गेलो, शब्दातही वर्णन करता येणार नाही इतका खास प्रसंग तो माझ्यासाठी होता असं बच्चन म्हणाले. 

रानू मंडलचं गाणं ऐकून लता मंगेशकर म्हणतात....

वहिदा रहमानसोबतच दिलिप कुमारही माझे प्रेरणास्थान असल्याचं बच्चन म्हणाले. वहिदा या उत्तम अभिनेत्री तर आहेतच पण माणूस म्हणूनही त्यांचा स्वभाव खूप छान आहे भारतीय नारीचं त्या मूर्तिमंत उदाहरण आहेत असं कौतुकही बच्चन यांनी केलं आहे.