पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बॉलिवूडमध्ये अमिताभ बच्चन यांचं अर्ध शतक

बॉलिवूडमध्ये अमिताभ बच्चन यांचं अर्ध शतक

भारतीय चित्रपटांच्या इतिहासाचा जेव्हा जेव्हा उल्लेख होईल तेव्हा त्यात 'अमिताभ बच्चन' हे नाव आवर्जून अव्वल स्थानी असेल. बच्चन यांच्या बॉलिवूडमधील करिअरला ७ नोव्हेंबर म्हणजे आज ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. भारतीय चित्रपटसृष्टीतले अनेक चढ- उतार, यश अपयशाचे बच्चन हे साक्षीदार आहेत. 'कुली' चित्रपटाच्यावेळी मृत्यूच्या दाढेतून बच्चन परत आले, त्यानंतर तब्येतीची अनेक दुखणी असतानाही ती बाजूला ठेवून आपलं आयुष्य त्यांनी चित्रपटसृष्टीला आणि प्रेक्षकांच्या सेवेला झोकून दिलं.

लहान मुलाविरोधात अपशब्द काढणाऱ्या स्वरा भास्करविरोधात तक्रार दाखल

अनेक दुखणी डोकं वर काढत असताना त्याकडे दुर्लक्ष  करत तितकाच हसत चेहरा ठेवत ते सध्या 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमाचं सुत्रसंचालन करत आहेत. 'मी कोणीही मोठा व्यक्ती नाही, मी इथे नोकरी करतो' असं सेटवर आलेल्या स्पर्धकाला सांगायला त्यांना कोणताही कमीपणा वाटत नाही. ७ नोव्हेंबर १९६९ रोजी बच्चन यांचा 'सात हिंदुस्थानी' चित्रपट प्रदर्शित झाला. या पन्नास वर्षांत बच्चन यांनी विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या. अलीकडच्या काळातील 'चिनीकम', 'निशब्द', 'पा', 'पिकू', 'पिंक', 'बदला', 'ठग्ज ऑफ हिंदोस्तान', मधल्या भूमिका या त्यांनी साकारलेल्या पूर्वीच्या भूमिकांपेक्षा खूपच वेगळ्या होत्या.

रानू मंडल यांचं महिला चाहतीसोबत गैरवर्तन, व्हिडीओ व्हायरल

बच्चन यांच्या समकालीन अनेक अभिनेत्यांनी चित्रपटसृष्टींतून विश्रांती घेतली आहे, मात्र वयाच्या ७७ व्या वर्षी बच्चन त्याच पूर्वीच्या उमेदीनं झोकून काम करत आहेत. आगामी काळात त्यांचे 'झुंड', 'गुलाबो सिताबो', 'ब्रह्मास्त्र'सारखे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. 

बॉलिवूडमध्ये ५० वर्षे पूर्ण करणाऱ्या बच्चन यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चननं देखील बच्चन यांच्यासाठी भाविनिक पोस्ट लिहिली आहे. 'एक मुलगा म्हणूनच नाही तर अभिनेता आणि चाहता म्हणूनही तुमच्याकडे पाहताना अभिमान वाटतो. तुमच्याकडून खूप  काही शिकण्यासारखे, समजून घेण्यासारखे आहे. चित्रपटप्रेमींच्या अनेक पिढ्या अभिमानानं सांगितलं आम्ही बच्चन  यांच्या काळात वाढलो. ' अशी पोस्ट अभिषेक बच्चन यांनी केली. 

ती काळाच्या विळख्यातून सुटू शकेल का?,‘विक्की वेलिंगकर’ टीझर प्रदर्शित