पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दोन वर्षांनंतर बच्चन यांच्या घरी दिवाळी पार्टी

दोन वर्षांनंतर बच्चन यांच्या घरी दिवाळी पार्टी

ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूडमधील मंडळींसाठी दिवाळी पार्टीचं आयोजन करतात.  मात्र गेल्या दोन वर्षांत बच्चन यांच्या घरी दिवाळी पार्टीचं आयोजन झालं नव्हतं. यंदा मात्र  बच्चन कुटुंबीय दणक्यात दिवाळी साजरी करणार आहेत. या  पार्टीत बॉलिवूडमधले अनेक सेलिब्रिटी कपल्स उपस्थित राहणार आहेत.

दीपिका पादुकोन साकारणार द्रौपदी

 २०१७ मध्ये बच्चन यांची सून ऐश्वर्यांच्या वडिलांचे निधन झाले तर २०१८ मध्ये बच्चन यांच्या मुलीच्या सासाऱ्यांचं निधन झालं. त्यामुळे गेली दोन वर्षे  दिवाळी पार्टीचं आयोजन झालं नव्हतं. मात्र दिवाळीच्या पहिल्या दिवशी बच्चन यांच्या घरी जंगी पार्टीचं आयोजन करण्यात येणार असल्याचं समजत आहे. 

राणादाचा कुस्तीला तात्पुरता रामराम, झाला पोलिसांत भरती

या पार्टीसाठी काजोल, अजय देवगन, शाहरुख गौरी, दीपिका, आलिया, रणबीर, रणवीर सिंह यांसारखे कलाकार उपस्थित राहणार असल्याचं समजत आहे.