पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

घराबाहेर जमलेल्या चाहत्यांची बच्चन यांनी मागितली माफी

चाहत्यांची बच्चन यांनी मागितली माफी

ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना पाहण्यासाठी दर रविवारी हजारो चाहते त्यांच्या बंगल्याबाहेर जमतात. बच्चन यांची एक झलक पाहता यावी, यासाठी सकाळपासूनच त्यांच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी जमते. या रविवारीदेखील अशीच गर्दी जमली होती. मात्र तब्येत ठिक नसल्यानं बच्चन यांना चाहत्यांची भेट घेता आली नाही.  त्यामुळे बच्चन यांनी चाहत्यांची  जाहीर माफी मागितली. 

कलाकारांनी PM मोदींसोबत केली गांधी विचारांबाबत खास चर्चा

 बच्चन यांना प्रकृतीच्या कारणावरून गेल्या आठवड्यात मंगळवारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तीन दिवसांनंतर बच्चन यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यांची तब्येत ठिक नसून त्यांना आराम करण्यासाठी सांगण्यात आलं आहे. प्रकृती ठिक नसल्यानं ते बाहेर येऊ शकले नाही.

मी आजारी आहे, पण तरीही ते रविवारी भेटण्यासाठी आले. मी तुम्हाला भेटायला येऊ शकलो नाही यासाठी क्षमस्व, असं म्हणत बच्चन यांनी दिलगीरी व्यक्त केली आहे. बच्चन यांनी चाहत्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते, ज्यात त्यांना पाहण्यासाठी चाहत्यांची तुफान गर्दी जमली होती. 

'नटसम्राट'चा तेलगूमध्ये रिमेक होणार?