पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बिग बी- आयुष्मानचा धम्माल कॉमेडी चित्रपट लवकरच

अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन यांच्यासोबत एकदा  तरी काम करायची संधी मिळावी  असं स्वप्न बॉलिवूडमधल्या अनेक कलाकारांचं असतं.  अभिनेता आयुष्मान  खुरानाचं बिग बींसोबत काम करण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे. २०१८ मध्ये दोन सुपरहिट चित्रपट आयुष्माननं दिले. आता आयुष्मान बिग बींसोबत काम करण्यास कमालीचा उत्सुक आहे. शूजित सरकारच्या आगामी चित्रपटात बिग बी- आयुष्मान ही जोडी झळकणार आहे.

बॉलिवूड चित्रपट दिग्दर्शक शूजित सरकार यांनी आतापर्यंत ‘पीकू’, ‘मद्रास कॅफे’ आणि ‘विक्की डोनर’ यासारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं असून लवकरच त्यांचा ‘गुलाबो सिताबो’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये अमिताभ आणि आयुष्मान पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार आहे. हा एक धम्माल कॉमेडी चित्रपट असेन अशी  माहिती चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी दिली.

 या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम सुरु असून चित्रपटाची कथा जुही चतुर्वेदी यांनी लिहिली आहे. जूनमध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. “सध्या मी आणि जुही या चित्रपटाच्या कथेवर काम करत आहोत. जुही जेव्हा एखाद्या चित्रपटाची कथा लिहित असते तेव्हा ती कथा कायम हटके असते. 'असा विश्वास सूजित यांनी व्यक्त केला आहे.  नोव्हेंबर २०१९ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 

याव्यतिरिक्त बिग हे  इम्रान हाश्मीच्या 'चेहरे' या चित्रपटात झळकणार आहेत. त्याचप्रमाणे नागराज मंजुळेंच्या 'झुंड' या चित्रपटातही ते दिसणार आहेत. तर २०१८ मध्ये 'अंधाधून' आणि 'बधाई हो' हे दोन सुपरहिट चित्रपट दिलेला आयुष्मान 'आर्टिकल १५' या चित्रपटात झळकणार आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Amitabh Bachchan and Ayushmann Khurrana team up for the first time in Shoojit Sircar Gulabo Sitabo