पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अमिताभ बच्चन २५ वर्षांनंतर झळकणार मराठी चित्रपटात

अमिताभ बच्चन

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे तब्बल २५ वर्षांनंतर मराठी चित्रपटात झळकणार आहेत. दिग्दर्शक मिलिंद लेले यांच्या 'एबी आणि सीडी' या चित्रपटात ते दिसणार आहेत.  बिग  बींच्या चाहत्यांसाठी ही नक्कीच हे खुशखबर आहे. यापूर्वी १९९४ मध्ये 'अक्का' या मराठी  चित्रपटात ते दिसले होते. या चित्रपटातील एका गाण्यात ते आणि पत्नी जया  बच्चन होत्या. हे गाणं त्यावेळी खूपच गाजलं होतं. बच्चन यांचे मेकअप मॅन दीपक सावंत यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं.

 बीग बी हे नेहमीच मराठी चित्रपटसृष्टीचं कौतुक करताना दिसतात.  मराठी सिनेसृष्टी, ही रंगभूमी आणि त्यासाठी स्वत:ला झोकून देऊन काम करण्याऱ्या कलाकारांचं बच्चन यांनी नेहमीच कौतुक केलं आहे. आता या मराठी मातीशी जोडण्याची संधी त्यांना या चित्रपटाच्या निमित्तानं पुन्हा एकदा मिळणार आहे. 

'एबी आणि सीडी' या चित्रपटात अमिताभ बच्चन हे काम करताना दिसतील अशी माहिती 'झूम'नं दिली आहे. येत्या २० मे पासून चित्रपटाच्या चित्रीकरणाला मुंबईत सुरुवात होणार आहे. 'बिग बी' सलग ५ दिवसांसाठी या चित्रपटाचे चित्रीकरण करणार आहेत. या चित्रपटात विक्रम गोखले मुख्य भूमिकेत आहेत. त्यामुळे 'अग्निपथ'नंतर आता पुन्हा एकदा हे दोन दिग्गज पडद्यावर एकत्र दिसणार आहेत.  बच्चन हे विक्रम गोखले यांच्या मित्राच्या भूमिकेत दिसणार आहेत.