बॉलिवूडचे 'महानायक' अमिताभ बच्चन यांचा आज ७७ वा वाढदिवस. फक्त भारतातच नाही तर जगभरातील चाहत्यांच्या गळ्यातले ताईत असलेल्या बच्चन यांचं व्यक्तीमत्व हे अनेक रंजक गोष्टींनी भरलं आहे. चला तर जाणून घेऊत अशाच काही न ऐकलेल्या रंजक गोष्टी
- अभिताभ बच्चन हे एकमेव अभिनेता आहेत ज्यांनी आपल्या मुलाच्या मुलाची भूमिका साकारली होती. अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांचा 'पा' चित्रपट आला होता. या चित्रपटात बिग बींनी अभिषेकच्या मुलाची भूमिका साकारली होती.
- बॉलिवूडचे महानायक असलेल्या बच्चन यांना इंजिनिअर व्हायचं होतं
- विजय हे अमिताभ बच्चन यांचं आवडतं नाव होय. २० चित्रपटांत त्यांनी विजय याच नावानं भूमिका साकारल्या आहेत.
दीपिकाच्या कपड्यांची अवघ्या दोन तासांत विक्री, संस्थेला करणार मदत
- 'खुदा गवाह' चित्रपटाच्या वेळी अफगाणिस्तानचे राष्ट्रपती नजीबुल्ला अहमदजई यांनी देशाची अर्धी सुरक्षा ही बच्चन यांच्यासाठी तैनात केली होती. नजीबुल्ला अहमदजई हे बॉलिवूड चित्रपटाचं चाहते होते. 'खुदा गवाह'चं चित्रीकरण अफगाणिस्तानात झालं होतं.
- बच्चन यांना दुर्मिळ पेन, घड्याळ्यांचा संग्रह करण्याचा छंद आहे.
- अनेकदा बच्चन हे जुहू इथल्या घरापासून मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरापर्यंत चालत दर्शनास जातात.
- जेव्हा ते कोलकात्यात वास्तव्यास होते तेव्हा आठ जणांसोबत त्यांना एकाच खोलीत रहावं लागत होतं.
बिग बींसोबत अफगाणिस्तानमध्ये घडलेल्या रोमांचकारी अनुभवांचा 'खुदा गवाह'