पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बिग बींसोबत अफगाणिस्तानमध्ये घडलेल्या रोमांचकारी अनुभवांचा 'खुदा गवाह'

खुदा गवाह

बॉलिवूडचे 'महानायक', 'अँग्री यंग मॅन'  आणि 'बिग बी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बच्चन यांचा आज वाढदिवस. बच्चन यांनी वयाची ७५ वी केव्हाच ओलांडली आहे. मात्र आजही त्यांचा कामाप्रतीचा उत्साह तरुणांना लाजवेल असा आहे. वयाच्या ७७ व्या वर्षी देखील सोशल मीडियावर सक्रीय असणारे आणि नेहमीचं काळाबरोबर चालणारे क्वचितच अभिनेते बॉलिवूडमध्ये असतील. अशा या बिग बींचे देशातच नाही तर जगभरात कोट्यवधी चाहते आहेत, अगदी अफगाणिस्तानात देखील.

'बिग बी' यांनी  सहा एक वर्षांपूर्वी आपल्या सोशल मीडियावर 'खुदा गवाह' चित्रपटाचे चित्रीकरण करताना आलेला अनुभव सांगितला  होता. श्रीदेवी  आणि बच्चन यांच्यासह अनेक कलाकारांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचं चित्रीकरण अफगाणिस्तान झालं होतं. त्यावेळी अफगाणिस्तानमधली परिस्थिती युद्धजन्यच होती. त्यावेळसचे राष्ट्रपती नजीबुल्ला अहमदजई यांनी बच्चन आणि चित्रपटाच्या संपूर्ण टीमसाठी चक्क सर्वाधिक सुरक्षा फौज तैनात केली होती. 

BLOG: अलौकिक, अद्भुत अमिताभ

'सोव्हिएत संघानं अफगाणिस्तान सोडला होता. नजीबुल्ला अहमदजई यांच्याकडे अफगाणिस्तानची सत्ता होती. नजीबुल्ला हे बॉलिवूड चित्रपटांचे निस्सिम चाहते होते. त्यांना मला भेटण्याची इच्छा होती. चित्रपटाच्या संपूर्ण टीमला त्यांनी राजेशाही वागणूक दिली.  मझार- ए- शरिफमध्ये तर आमची विशेष अतिथीप्रमाणे काळजी घेण्यात आली होती. इतकंच नाही तर विमानातून सुरक्षारक्षकांच्या देखरेखीत आम्ही प्रवास करत होतो. पारंपरिक पद्धतीनं आमचं स्थानिकांनी स्वागत केलं. आम्हाला हॉटेलमध्ये राहायला न देता स्थानिकांच्या घरात राहण्याचा आग्रह करण्यात आला. काही कुटुंबांनी आमची त्यांच्या घरात राहण्याची  व्यवस्था केली आणि ते काही दिवसांसाठी छोट्या घरात राहायला गेले.' अशी आठवण बच्चन यांनी सांगितली. 

पीएमसी बँक : अभिनेत्रीकडे घर खर्चालाही पैसे नाही, दागिने विकण्याची वेळ

तो काळ अत्यंत कठीण होता. रस्त्यावर शस्त्रधारी सैनिक, रणगाडे उभे होते. ती युद्धभूमी होती. पण तरीही आमचं प्रेमानं आदरतिथ्य केलं गेलं, अफगाणिस्तानातली ती आठवण मी कधीच विसरू शकणार नाही, आमच्यावर स्थानिकांकडून प्रेमाच, शुभेच्छांचा, भेटवस्तूंचा वर्षाव होत होता, असं बच्चन यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं होतं.