पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सत श्री अकाल जी, लाल सिंह चड्ढा आलाय भेटीला

लाल सिंह चड्ढा

आमिर खानचा 'लाल सिंह चड्ढा' हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच चर्चेत आला आहे. बॉलिवूडमधला 'मिस्टर परफेक्शनिस्ट' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या  'लाल सिंह चड्ढा' मधला  फर्स्ट लूक शेअर करण्यात आला आहे. आमिरनं आपल्या ट्विटमधून तो साकारत असलेल्या  लाल सिंह चड्ढा या भूमिकेशी ओळख करून दिली आहे. १ नोव्हेंबरपासून या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात झाली आहे. 

पहिल्यांदाच करिनाला 'लाल सिंग चड्ढा'साठी आमिरनं द्यायला लावली ऑडिशन

१९९४ साली प्रदर्शित झालेल्या प्रसिद्ध हॉलिवूड चित्रपट 'फॉरेस्ट गम्प'चा हा अधिकृत रिमेक आहे. अभिनेता अतुल कुलकर्णी यानं चित्रपटाची कथा लिहिली आहे. आमिर  'लाल सिंह चड्ढा' ही शिख व्यक्तीरेखा साकारत आहे. या भूमिकेसाठी आमिरनं मेहनत घेतली असून तब्बल २० किलो वजनही त्यानं कमी  आहे. आमिरसोबत करिना कपूरही या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहे. 

२०२० मध्ये नाताळात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सलमान खान आणि आमिर खानही पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार अशी चर्चा आहे.

'लाल सिंग चड्ढा'मध्ये आमिरसोबत शाहरुख- सलमानही?