पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शोलेपासून ते DDLJ, ट्रम्प यांच्याकडून बॉलिवूडचं कौतुक

शोलेपासून ते DDLJ, ट्रम्प यांच्याकडून बॉलिवूडचं कौतुक

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे दोन दिवसीय भारत दौऱ्यावर आहे.  या दौऱ्यात ट्रम्प यांनी मोटेरा स्टेडियममधून  'नमस्ते ट्रम्प' या कार्यक्रमाअंर्तगत देशवासीयांशी संवाद साधला. या संवादादरम्यान दोन्ही देशांतील संबंध, व्यापार, दहशतवाद यांच्यावर चर्चा झालीच, मात्र या भाषणात ट्रम्प यांनी बॉलिवूडचाही उल्लेख केला.

२८ तारखेला प्रेक्षकांना मिळणार गश्मीर-पूजाकडून 'बोनस'

 भारतीय मनोरंजन सृष्टीमुळे अनेक नव्या गोष्टी जगाला कळल्या. दरवर्षी इथे जगापेक्षा सर्वाधिक चित्रपटांची  निर्मिती होते. या मनोरंजनसृष्टीमुळे आमची संगीत, रोमॅन्स,  भांगडा, नव्या गाण्यांची ओळख झाली, असं ट्रम्प म्हणाले.  भारतीय मनोरंजन सृष्टीचं कौतुक करताना त्यांनी बॉलिवूडच्या  दोन गाजलेल्या चित्रपटांचाही उल्लेख केला. यात  'शोले' आणि 'दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे' या चित्रपटांचा समावेश होता. 

बॉलिवूड चित्रपट हे जगाच्या पाठीवरील प्रेक्षकांना आनंद देतात असंही ट्रम्प यांनी सांगितलं. 

दिशाच्या बॉडीगार्डची फोटोग्राफरला धक्काबुक्की, मॅनेजरनं मागितली माफी