पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आलियाची अवस्था 'तेलही गेले, तूपही गेले..' सारखी

आलिया भट्ट

मराठीत एक म्हण आहे तेलही गेले, तूपही गेले अन् हाती धुपाटणे आले. अशीच काहीशी परिस्थिती अभिनेत्री आलिया भट्टची झाली आहे. ती सलमानसोबत संजय लीला भन्साळी यांच्या 'इंशाल्लाह' चित्रपटात झळकणार होती. मात्र सलमानसोबत झालेल्या काही मतभेदांमुळे दिग्दर्शक भन्साळी यांनी हा चित्रपट न करण्याचा निर्णय घेतला.

दबंग ३ : सलमानच्या प्रेयसीच्या भूमिकेत दिसणार महेश मांजरेकरांची मुलगी

आलियानं या चित्रपटात काम करण्यासाठी आमिरच्या 'आशो'ला नकार दिला होता. आता हे दोन्ही चित्रपट हातातून गेले असल्यानं आलिया दु:खी असल्याची माहिती तिच्या जवळच्या व्यक्तीनं दिली आहे.

आलियानं आपल्या वेळापत्रकातील तारखा 'इंशाल्लाह'साठी राखून ठेवल्या होत्या. तिला याचदरम्यान आमिर खानच्या 'आशो' चित्रपटाबद्दल विचारण्यात आलं होतं. मात्र व्यग्र वेळापत्रकामुळे तिच्याजवळ 'आशो'साठी वेळ नव्हता. त्यामुळे तिनं या चित्रपटाला नकार  दिल्याचं म्हटलं जातं होतं.

अजय देवगन घेतली आलिशान कार, फक्त दोन भारतीयांकडेच आहे ती कार

मात्र चित्रीकरण सुरु व्हायच्या दोन दिवस आधीच 'इंशाल्लाह'चं पूर्ण काम थांबवण्यात आलं असून तूर्त हा चित्रपट करण्याचा कोणताही विचार नसल्याचं भन्साळीच्या निर्माता संस्थेनं स्पष्ट केलं आहे. अचानक दोन्ही चित्रपट हातातून निघून गेल्यानं तेलही गेले, तूपही गेले अशी परिस्थिती आलियाची झाली आहे.