पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आलिया भट्ट 'गंगूबाई कोठेवाली' यांच्या भूमिकेत

आलिया भट्ट 'गंगूबाई'च्या भूमिकेत

कामाठीपुरामधल्या देहविक्रेय करणाऱ्या  महिलांसाठी 'गंगूबाई' हे नाव देवदूतापेक्षा कमी नाही. त्या हयात नसल्या तरी त्यांचं नाव आदरानं आजही तिथे घेतलं जातं. त्यांच्या अनेक गोष्टी कामाठीपुरामधल्या देहविक्रेय करणाऱ्या  महिलांच्या वस्तीत दंतकथा बनून  राहिल्या आहेत. नववारी साडी आणि कपाळावर मोठी टिकली लावून वावरणाऱ्या गंगूबाई  या 'गंगूबाई कोठेवाली' म्हणून ओळखल्या जायच्या. 

'माझ्या लहान मुलासोबतही पाहू शकतो असेच चित्रपट निवडतो'

त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट येत आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून  चर्चेत असलेल्या या चित्रपटाची घोषणा अखेर चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी केली आहे.  संजय लिला भन्साळी यांची निर्मीती असलेल्या या चित्रपटात आलिया भट्ट 'गंगूबाई'च्या भूमिकेत आहे. 

पत्रकार हुसैन झैदी यांनी लिहिलेल्या 'माफिया क्वीन्स ऑफ मुंबई'  या कांदबरीत  गंगूबाई यांच्याविषयी लिहलं गेलं आहे. नवऱ्यानं फसवून त्यांना देहविक्रेय करणाऱ्या महिलेला विकलं होतं. सधन  कुटुंबातून आलेल्या गंगूबाईचं कमी वयात आयुष्य उद्धवस्त झालं.  गंगूबाईंच्या परतीचे दरवाजे बंद झाले. देहविक्रेय करायला नशीबानं भाग पाडलं असलं तरी  पुढे  याच गंगूबाई देहविक्रेय करणाऱ्या महिलांसाठी आशेच्या किरण ठरल्या होत्या.

अक्षयसाठी 'द कपिल शर्मा शो'मध्ये होणार हा सर्वात मोठा बदल

मनाविरुद्ध या व्यवसायात ओढल्या गेलेल्या मुलींची सुटका करून त्यांना गंगूबाई घरी पाठवून दयायच्या, असंही वर्णन झैदी यांनी आपल्या कांदबरीत  केलं आहे. 'गंगूबाई काठीयावाडी' नावानं हा चित्रपट ११ सप्टेंबर २०२० ला प्रदर्शित होत आहे