पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मैत्रीचा हात पुढे करत कंगनाला आलियानं पाठवली खास भेट

कंगनाला आलियाकडून सप्रेम भेट

अभिनेत्री कंगना राणौत आणि आलिया भट्ट या दोघांमधला वाद सर्वश्रुत आहे. कंगनानं एका मुलाखतीत आलिया भट्टवर कडाडून टिका केली होती, या वादात आलियानं सुरुवातीला नमतं घेतलं मात्र नंतर या दोघींमधला वाद विकोपाला पोहोचला. आता मात्र आलियानं हा वाद मिटवण्यासाठी स्वत: मैत्रीचा हात पुढे केला असंच दिसतंय. 

अभिनेत्याला त्रास देणाऱ्या 'स्वीटी सातारकर'चा पत्ता सापडला

पद्मश्री पुरस्कार कंगनाला जाहीर झाल्यानंतर आलियानं सर्वप्रथम कंगनाचं अभिनंदन केलं. आलियानं कंगनासाठी पुष्पगुच्छ पाठवून तिच्यासाठी शुभेच्छापत्रही  लिहिलं. कंगनाची बहीण रंगोलीनं आलियाकडून आलेल्या या खास भेटीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. 

 आलियानं देखील कंगनाला पुष्पगुच्छ पाठवला आहे. कंगनाचं माहिती नाही मात्र मला फार आनंद होत आहे  असं तिच्या बहिणीनं लिहिलं आहे. सामाजिक आणि राजकीय प्रश्नांवर आलिया भूमिका घेत नाही यांपासून ते आलियाच्या अभिनय कौशल्याचाही कंगनानं जाहीर उद्धार केला होता. हा वाद विकोपाला पोहोचला होता. 

कोण म्हणतं कुर्ता स्टाइलिस्ट नाही?