पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'इंशाअल्लाह'मध्ये सलमान- आलियासोबत दिसणार आणखी एक अभिनेत्री?

सलमान खान- आलिया भट्ट

संजय लीला भन्साळी यांचा 'इंशाअल्लाह' चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होत आहे. चित्रपटातील स्टारकास्टमुळे हा चित्रपट चर्चेत आला आहे. या चित्रपटात आलिया भट्ट आणि सलमान खान प्रमुख भूमिकेत आहेत. पण, त्याचबरोबर या चित्रपटात आणखी एक अभिनेत्री दिसणार आहे.

पिंक व्हिला या संकेतस्थळानं सुत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या माहितीनुसार यात आणखी एक अभिनेत्री प्रमुख भूमिकेत दिसणार असल्याचं म्हटलं आहे. संजय लीला भन्साळी यांच्या काही चित्रपटांप्रमाणे यात प्रेमाचा त्रिकुट दाखवला जाणार आहे, असंदेखील सुत्रानं सांगितलं आहे. हा चित्रपट २०२० साली ईदला प्रदर्शित होत आहे. त्यामुळे तिसरी अभिनेत्री कोण असेन  याची उत्सुकता सर्वांनाच आहे. 

आतापर्यंत मला कोणीही लग्नाची मागणी घातली नाही- सलमान खान

त्याचप्रमाणे सलमान आणि आलियातील वयाचं अंतर पाहता ही जोडी नेमकी पडद्यावर  कशी दिसेन याचं कुतूहल तमाम चाहत्यांना आहे. या चित्रपटात सलमानची भूमिका नेमकी  काय असणार हे गेल्याच महिन्यात उघड झालं होतं. 

सलमान  या चित्रपटात फ्लोरिडास्थित एका व्यावसायिकाची भूमिका साकारत आहे. सलमान 'इंशाअल्लाह'मध्ये ४० वर्षांच्या व्यावसायिकाच्या भूमिकेत दिसेन अशी माहिती  मुंबई मिररनं सुत्रांच्या हवाल्यानं दिली आहे. तर आलिया ही गंगेच्या काठी राहणाऱ्या एका विशीतल्या तरूणीची भूमिका साकारत आहे. 

'अँग्री बर्ड २' साठी कपिल देणार आवाज

सध्या या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी भन्साळी जागेच्या शोधात आहे.  या चित्रपटाचं काही चित्रीकरण फ्लोरिडामध्ये होत असल्यानं भन्साळी एका  चांगल्या जागेच्या शोधात असल्याचं समजत आहे.