पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आलिया- रणबीर २०२० मध्ये अडकणार विवाहबंधनात?

आलिया- रणबीर

बॉलिवूडमधलं लोकप्रिय जोडपं आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या लग्नाची उत्सुकता त्यांच्या तमाम चाहत्यांना लागली आहे. 'ब्रह्मास्त्र'च्या सेटवर या दोघांचे सूत जुळले आणि तिथूनच प्रेमकहाणीला सुरूवात झाली. सर्वप्रथम अभिनेत्री सोनम  कपूरच्या लग्नात या जोडीला एकत्र पाहण्यात आलं होतं. तेव्हापासून अनेकदा लग्न कधी करणार ? या प्रश्नानं अक्षरश: दोघांचा पिच्छा पुरवला. ही जोडी आता २०२० च्या अखेरीस विवाहबंधनात अडकणार असं समजत आहे. 

Throwback Thursday : तर 'बालिका बधू' मध्ये दिसले असते रणवीर -आलिया

आलिया आणि रणबीर २०२० मध्ये हिवाळ्यात विवाहबंधनात अडकतील. तोपर्यंत दोघांची अनेक कामं नक्कीच मार्गी लागली असतील. रणबीरनं लग्नासाठी महिन्याभराची सुट्टी घेण्याचंही ठरवलं आहे. त्यांच्या काही चित्रपटांचं काम सुरु आहे. हे दोघंही  डिसेंबर- नोव्हेंबरच्या आधी काम संपवण्याचा प्रयत्न करतील, अशी माहिती दोघांच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीनं दिली असल्याचं समजत आहे. 

'जिथे मनोरंजन असते तिथे कोणत्या ना कोणत्या स्वरुपाचा वाद असतोच'

ही जोडी आयान मुखर्जी दिग्दर्शित 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात दिसणार आहे.