पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अंबानींच्या घरी दर्शनासाठी आलेल्या रणबीर- अलियानं वेधलं सर्वांचं लक्ष

रणबीर- आलिया

रणबीर आणि आलिया हे बॉलिवूडमधलं सर्वात चर्चेत असलेलं जोडपं आहे. नुकतंच या जोडीनं अंबानींच्या घरी विराजमान झालेल्या गणरायाचं दर्शन घेतलं. गणेशोत्सवासाठी अंबानी परिवारानं बॉलिवूड सेलिब्रिटींना खास आमंत्रण दिलं होतं. गणरायाच्या दर्शनासाठी बॉलिवूडमधले अनेक कलाकार उपस्थित होते. 

रणबीर- आलिया

मात्र या सर्वांत आलिया आणि रणबीरनं सर्वांचं लक्ष वेधलं. ही जोडी गेल्या वर्षभरापासून चर्चेत आहे. आलिया आणि रणबीर २०१८ पासून एकमेकांना डेट करत आहेत. ते दोघंही 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान दोघांची प्रेमकहाणी सुरू झाली. 

बच्चन कुटुंबीय- करण जोहर

साडी नेसून पारंपरिक पेहरावात आलेल्या  आलिया आणि रणबीरच्या जोडीची चर्चा सर्व ठिकाणी होती. अंबानींच्या घरी दर्शनासाठी रणबीर- आलियाबरोबरच बच्चन कुटुंबीय, माधुरी दीक्षित, आमिर खान, काजोल, करण जोहर, शेट्टी कुटुंबीय, कतरिना, विकी कौशल यांसारखे अनेक कलाकारही आले होते.

अदिती राव हैदरी- रेखा