पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आलिया म्हणते आमच्या नात्याला नजर न लागो

आलिया रणबीर

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे  सध्या बॉलिवूडमधलं सर्वाधिक चर्चेत असलेलं जोडपं होय. काही महिन्यांपूर्वी रणबीरनं एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत तिच्यावरचं प्रेम कबुल केलं होतं. मात्र आलिया आपल्या नात्याविषयी फारशी खुलेपणानं बोलताना दिसत नाही. नुकतीच टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत आलियानं रणबीर सोबतचं नातं हे  मैत्रीचं असल्याचं म्हटलं आहे. 

बिग बॉस मराठी २ : शिव्या देण्यापासून बिचुकलेंना थांबवलं नाही कारण...

'आमच्यात मैत्रीचं छान नातं आहे. मी हे खूप प्रामाणिकपणे सांगत आहे. हे नातं  सर्वात सुंदर आहे. या नात्यामधली सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आम्हा दोघांचं वेगळं अस्तित्त्व आम्ही जपत आहोत आणि  आपापल्या क्षेत्रात आम्ही मन लावून काम करत आहोत. आम्ही दोघंही सध्या चित्रीकरणात व्यग्र आहोत. आम्ही प्रत्येकवेळी एकत्र नसतो मात्र तरीही सारं काही सुरळीत सुरू आहे. या गोष्टीला कोणाचीही नजर लागू नये एवढीच इच्छा असल्याचं  आलिया या मुलाखती म्हणाली. 

तीन दिवसांत 'कबीर सिंग'ची रेकॉर्ड ब्रेक कमाई

आलिया आणि रणबीर लग्न करणार अशाही चर्चा कित्येक महिन्यांपासून आहेत. मात्र या बातम्या वाचून  मला वीट आला आहे. रणबीरला मात्र या सर्व गोष्टींची सवय झाली असल्याचं ती म्हणते.  रणबीरचं व्यक्तीमत्त्व खूपच साधं आहे, त्याला आयुष्यात भूतकाळात नक्कीच वाईट गोष्टी घडल्या असतील पण त्यानं फारसा फरक पडत नाही असंही तिनं स्पष्ट केलं आहे.