पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'गंगूबाई काठियावाडी'च्या शूटिंगवेळी आलिया भट जखमी

आलिया भट

संजय लीला भन्साळी यांच्या आगामी 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमाच्या शूटिंगवेळी अभिनेत्री आलिया भट जखमी झाली. तिच्या पाठीला शूटिंगवेळी जखम झाल्याची माहिती आहे. या सिनेमामध्ये आलिया भट प्रमुख भूमिकेत आहे. तिने तिच्या इन्स्टा स्टोरीवरून आपल्या जखमेबद्दल माहिती दिली. अर्थात आलियाची तब्येत आता ठीक आहे. दरम्यान, आलिया भटने गंगूबाई काठियावाडीच्या सेटवर जखमी झाल्याच्या वृत्ताचा इन्कार केला आहे. 

धक्कादायक! मुंबईत प्रवासी महिलेवर सामूहिक बलात्कार, चौघांना अटक

आलिया भटने तिची आवडती मांजर एडीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती पांघरूण घेऊन झोपल्याचे दिसते. या फोटोसोबत दिलेल्या ओळींमध्ये तिने लिहिले आहे की, आईसोबत सेल्फीची वेळ. कारण आईच्या पाठीला जखम झालीये आणि रात्रीचे दोन वाजता यापेक्षा वेगळं काही करता येत नाही. एडी आणि आई.

'नाईट लाईफ भारतीय संस्कृती नाही, यामुळे निर्भयासारख्या घटना वाढतील'

आलिया भटचा हा फोटो सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहे. त्याचवेळी तिच्या चाहत्यांनी आलिया भट लवकर बरी व्हावी, यासाठी प्रार्थना केली आहे. आलिया नक्की जखम कशामुळे झाली, याची कोणतीही माहिती उपलब्ध नाही. पण माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार गंगूबाई काठियावाडी सिनेमाच्या शूटिंगवेळीच आलियाला ही जखम झाली. आलिया सोशल मीडिया साईट्सवर आयुष्यातील वेगवेगळ्या घटनांबद्दल माहिती देत असते.