पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

..म्हणून चाहत्यांना ‘I love you’ बोलण्यास आलियाचा नकार

आलिया भट्ट

आलिया  भट्ट ही अभिनेत्री तरूण वर्गामध्ये सर्वाधिक लोकप्रिय आहे. 'राझी', 'गल्ली बॉय' सारख्या चित्रपटांमुळे तिच्या लोकप्रियतेत वाढ झाली. तिचा चाहता वर्ग हा खूपच मोठा आहे.  चाहते अनेकदा तिच्यावर, तिच्या अभिनयावर आपलं प्रेम व्यक्त करतात. तिच्या कामाचं कौतुक करतात. मात्र या चाहत्यांना ‘I love you’ बोलण्यावर आलियाच अजिबात विश्वास नाही. चाहत्यांवर  प्रेम व्यक्त करण्याची ही पद्धत नाही असं तिला वाटतं. 

मल्लिका म्हणते, अभिनेत्यांच्या गर्लफ्रेंड्समुळे गमावले २०-३० चित्रपट

जर चाहत्यांवर प्रेम व्यक्त करायचं असेन तर चांगलं काम करा, चांगला चित्रपट द्या असं ती मानते. ट्विटरवर चाहत्यांना ‘I love you’  म्हणण्यास माझी हरकत आहे. चांगल्या कामातून प्रेम व्यक्त करण्यावर मी विश्वास ठेवते. जर चित्रपटच चालला नाही तर मी माझ्या चाहत्यांचा अपेक्षाभंग केला ही खंत मला सतत जाणवत राहते, असंही आलिया म्हणाली.

'खूबसुरतमध्ये माझ्यासोबत कोणीही काम करायला तयार नव्हतं'

आलिया भट्ट सध्या अभिनेता रणबीर कपूरला डेट करत आहे. ते दोघंही सध्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. याव्यतिरक्त आलिया ही संजय लीली भन्साळी यांच्या 'ईन्शाअल्लाह' या चित्रपटाही दिसणार आहे. या चित्रपटात आलियासोबत सलमान खान प्रमुख भूमिकेत आहे.