पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

... आणि आलियाने कपूर कुटुंबियांसोबत केले नववर्षाचे स्वागत

आलिया भटने रणबीर कपूरच्या कुटुंबियांसोबत केले नववर्षाचे स्वागत

अभिनेत्री आलिया भट आणि अभिनेता रणबीर कपूर सध्या कायम चर्चेत असतात. नवे २०२० वर्ष या दोघांसाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. काही दिवसांपूर्वीच हे दोन्ही कलाकार मुंबई विमानतळावर दिसले होते. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी ते परदेशात निघाले होते. पण नक्की कोणत्या देशात निघाले होते, हे त्यावेळी स्पष्ट झाले नव्हते. 

Happy Birthday: रसिकांना मनसोक्त हसवण्याचा वसा घेतलेला कलाकार

मंगळवारी नववर्ष स्वागताच्या पूर्वसंध्येला रणबीरने एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याच्यासोबत आलिया भट आणि कपूर परिवारातील इतर सदस्यही दिसतात. या फोटोमध्ये आलिया, रणबीरची आई नीतू कपूर, बहिण ऋद्धिमा कपूरही दिसतात. या फोटोसोबत रणबीरने आपल्या सर्व चाहत्यांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचवेळी आलिया भटनेही एक फोटो तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे. या फोटोसोबत तिने लिहिले आहे की लाईट इज कमिंग २०२०.

अनुष्काच्या या कलेचं विराटकडून कौतुक

आलिया आणि रणबीर हे दोघेही सध्या त्यांच्या आगामी ब्रह्मास्त्र सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहेत. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचे शूटिंग संपवून हे दोघेही मुंबईत आले होते. याच वर्षात हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

the light is coming ✨2020 ☀️

A post shared by Alia ☀️ (@aliaabhatt) on

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Happy New Year 2020 🌟💫

A post shared by Ranbir kapoor ⭐ (@ranbirkapoor143_) on