पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आलिया- रणबीरची पुन्हा एकदा न्यूयॉर्कवारी

आलिया रणबीर

आलिया आणि रणबीर ही बॉलिवूडमधली जोडी चाहत्यांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. २०१८ पासून ही जोडी एकत्र आहे. 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या सेटवर या दोघांची प्रेमकहाणी सुरू झाली. सोनम कपूरच्या लग्नात ही जोडी पहिल्यांदा एकत्र दिसली होती. रणबीरनंही सर्वांसमोर आलियावरचं प्रेम मान्य केलं. त्यानंतर बरेचदा ही जोडी एकत्र वावरताना दिसली. 

तुषारसोबत भांडण झाल्यानंतर एकतानं पोलिसांना केला होता फोन

हे जोडपं आता पुन्हा एकदा न्यूयॉर्कमध्ये पहायला मिळालं. रणबीरचे वडील ऋषी कपूर हे गेल्या काही महिन्यांपासून लंडनमध्ये आहेत. ते तिथे कॅन्सरवर उपचार घेत आहेत. साधरण ऑगस्ट महिन्यात उपचार संपवून ते भारतात परतणार अशी आशा आहे. तत्पुर्वी त्यांच्या पायाची शस्त्रक्रिया होणार आहे आणि त्यासाठीच आलिया- रणबीर न्यूयॉर्कला पोहोचले  असल्याचं म्हटलं जात आहे. 

आलिया आणि रणबीरचे न्यूयॉर्कमधले फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ऋषी कपूर हे अमेरिकेत उपचार घेत असल्यानं अनेकदा रणबीर अमेरिकेत असतो.  कपूर कुटुंबासोबत आलिया देखील वेळ व्यतीत करताना दिसते. 

माझ्या हॉट फोटोवर सर्वाधिक प्रतिक्रिया येतात- नीना गुप्ता

आलियासोबत यावेळी  बच्चन कुटुंबीय देखील पाहायला मिळालं. अभिषेक आणि ऐश्वर्या सध्या अमेरिकेत सुट्ट्या व्यतीत करत आहेत यावेळी अभिषेक- ऐश्वर्यानं ऋषी कपूर यांची भेट घेत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.