पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'फॅमिली'साठी कलाकारांचे शूट कोणी केलं माहितीये?

फॅमिली शॉर्ट फिल्म

विविध चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या देशभरातील अनेक कलाकारांनी एकत्र येऊन 'फॅमिली' ही शॉर्ट फिल्म चित्रीत केली. चित्रीकरणासाठी  एकही कलाकार घराबाहेर पडला नाही. प्रत्येकानं घरात थांबूनच चित्रीकरण केलं. यातले काही कलाकाकार एकमेकांपासून हजारो किलोमीटर दूर होते. असे असताना या कलाकारांनी एकमेकांशी समन्वय कसा साधला आणि त्यांचं चित्रीकरण कोणी केलं हे जाणून घेण्याचं कुतूहल अनेकांना असेलच. 

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा १,२९७ वर, १६२ रुग्णांना डिस्चार्ज

तर कलाकारांसाठी कॅमेरामन कोण झाला याचं गुपित या शॉर्ट फिल्मचे दिग्दर्शक प्रसून पांडे यांनी सांगितलं. त्यांच्या डोक्यातून ही कल्पना प्रत्यक्षात उतरली. २ एप्रिलला प्रसून यांनी कलाकारांना कल्पना ऐकवली होती. कोणत्या कलाकारांनी कसा कॅमेरा अँगल  पकडायचा, कसं शूट करायचं अशा सगळ्या सूचना त्यांना करण्यात आल्या होत्या.

नैराश्येतून खळखळून हसविण्याकडे, लॉकडाऊनमध्ये अभिनेत्याचा नवा प्रयोग

आलिया आणि रणबीरनं एकमेकांचं चित्रीकरण केलं. लॉकडाऊननंतर ते दोघंही सध्या एकत्र राहत आहेत, त्यामुळे आलियाचा भाग रणबीरनं तर रणबीरचा भाग आलियानं चित्रीत केला.  प्रियांका चोप्रासाठी तिचा पती निक जोनास कॅमेरामन झाला तर रजनिकांत याचं चित्रीकरण त्यांची मुलगी सौंदर्या हिनं केलं. 
या शॉर्टफिल्ममध्ये अमिताभ बच्चन, रजनिकांत, रणबीर कपूर, आलिया भट्ट, प्रियांका चोप्रा, दिलजित दोसांज, चिंरजीवी, शिव कुमार, मोहन लाल, सोनाली कुलकर्णी यासारखे बॉलिवूड, मराठी, दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतले अनेक कलाकार पहायला मिळत आहेत.