पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Throwback Thursday : तर 'बालिका बधू' मध्ये दिसले असते रणवीर -आलिया

रणबीर- आलिया

आलिया  भट्ट आणि रणबीर कपूर हे बॉलिवूडमधलं सर्वाधिक चर्चेत असलेलं जोडपं होयं.  'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या सेटवरून या दोघांच्या प्रेमकहाणीस सुरुवात झाली.  आलियानं  करण जोहरच्या 'स्टुडंट ऑफ द इअर' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि अल्पावधित आलियानं बॉलिवूडमध्ये स्वत:चं स्थान निर्माण केलं. तर संजय लीला भन्साळींच्या 'सावरियाँ'मधून रणबीर कपूरनं पदार्पण केलं.  मात्र रणवीरचा पदार्पणाचा चित्रपट फारसा चालला नाही. 

अंगात दहा हत्तीचं बळ आलं, गोवारीकरांनी मानले राज ठाकरेंचे आभार

आलिया आणि रणबीर पहिल्यांदाच 'ब्रह्मास्त्र' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. मात्र हे दोघंही संजय लीला भन्साळींच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार होते. संजय लीला भन्साळींना 'बालिका बधू' या चित्रपटाचा रिमेक प्रेक्षकांच्या भेटीला आणायचा होता. यासाठी भन्साळींनी आलिया आणि रणबीरची निवड केली होती.  या दोघांनी चित्रपटासाठी फोटोशूटही केलं होतं. मात्र तेव्हा काही  गोष्टी जुळून आल्या नाहीत आणि हा चित्रपट भन्साळींना रद्द करावा लागला.

दीपिकाला साकारायचीये 'देसी सुपरवुमन'

याचा उल्लेख अनेकदा रणबीर आणि आलियानं आपल्या मुलाखतीत केला होता.