पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'मिशन मंगल'मध्ये अक्षयची भूमिका केवळ २५ मिनिटांची?

मिशन मंगल

अक्षय कुमार, तापसी पन्नू, शरमन जोशी, विद्या बालन यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'मिशन मंगल' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख  बदलण्यात आली आहे. हा चित्रपट १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार होता आता हा चित्रपट ९ ऑगस्टला प्रदर्शित होत आहे. १५ ऑगस्टला जॉन अब्राहमचा 'बाटला हाऊस'  आणि प्रभासचा 'साहो' चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या तिन्ही चित्रपटाची टक्कर टाळण्यासाठी 'मिशन मंगल'च्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली आहे. 

तर दुसरीकडे या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमारची केवळ २५ मिनिटांची भूमिका असल्याचं म्हटलं जात आहे. बॉलिवूड हंगामाच्या वृत्तानुसार अक्षयची भूमिका ही लहान असून तो पाहुण्या कलाकाराच्या  भूमिकेत आहे. आर बाल्की  या चित्रपटाचे निर्माते असून जगन शक्ती या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. 

भारताच्या पहिल्या मंगळयान मोहिमेत  मोलाचं योगदान देणाऱ्या वैज्ञानिकांच्या जीवनावर या चित्रपटाची कथा आधारलेली असल्याचं म्हटलं आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण काही महिन्यांपूर्वी पूर्ण झालं होतं. हा चित्रपट १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार होता मात्र निर्मात्यांनी इतर चित्रपटांसोबत हा चित्रपट क्लॅश होऊ नये म्हणून प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे.