पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Mission Mangal trailer : भारताच्या स्वप्नपूर्तीची असामान्य कथा

मिशन मंगलयान

अक्षय कुमारसह अनेक बॉलिवूड कलाकारांचा समावेश असलेल्या बहुप्रतीक्षीत आणि बहुचर्चित अशा  'मिशन मंगल' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. भारताच्या स्वप्नपूर्तीची ही असामान्य कथा आहे. हा चित्रपट भारताच्या मंगळयान मोहिमेवर आधारित आहे. 

अक्षयसह सोनाक्षी सिन्हा, विद्या बालन, तापसी पन्नू, नित्या मेनन यांची प्रमुख भूमिका या चित्रपटात आहे. येत्या १५ ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. भारताच्या मंगळयान मोहिमीची कथा सांगणारा हा  चित्रपट आहे. भारतीय वैज्ञानिकांनी या मोहिमेसाठी खूपच मेहनत घेतली. या मोहिमेत महिला वैज्ञानिकांनी  दिलेलं योगदान महत्त्वपूर्ण आहे. या चित्रपटातून मंगळयान मोहिमेसाठी महिला आणि भारतीय वैज्ञानिकांनी दिलेलं  योगदान अधोरेखित केलं आहे. 

या चित्रपटाचा ट्रेलर पाहून अनेकांनी अक्षय कुमार आणि संपूर्ण टीमचं कौतुक केलं आहे. जगन शक्ती यांनी 'मिशन मंगल' चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. तर 'पॅडमॅन' चित्रपटाचे दिग्दर्शक आर बाल्की हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. 'स्वातंत्र्य दिना'दिवशी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे, याच दिवशी जॉन अब्राहमचा  'बाटला हाऊस' आणि प्रभासचा 'साहो' चित्रपटही प्रदर्शित होत आहे.