पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Mission Mangal teaser : 'मिशन मंगल'चा टीझर प्रदर्शित

मिशन मंगल

अक्षय  कुमार, विद्या बालनसह अनेक बॉलिवूड कलाकारांचा सहभाग असलेला बहुचर्चित चित्रपट  'मिशन मंगल'चा टीझर प्रदर्शित  झाला आहे. येत्या १५ ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. भारताच्या  मंगळयान मोहीमेवर आधारित हा चित्रपट आहे. टीझरमध्ये भारताच्या या महत्त्वाकांक्षी मोहीमेची झलक पहायला मिळते आहे. 

एक देश, एक स्वप्न आणि एक इतिहास, भारताच्या आंतराळ मोहीमेची यशोगाथा सांगणारा हा  चित्रपट असल्याचं कौतुक करत अक्षयनं या चित्रपटाचा टीझर आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे.

अक्षय या मोहिमेचा प्रमुख वैज्ञानिक राकेश धवनच्या भूमिकेत आहे. तर विद्या ही वरिष्ठ पदी असलेल्या वैज्ञानिकेच्या भूमिकेत आहे. याव्यतिरिक्त तापसी पन्नू, शरमन जोशी, सोनाक्षी यांसारखे कलाकारही पहायला मिळणार आहेत. याच दिवशी प्रभासचा 'साहो' आणि जॉन अब्राहमचा 'बाटला हाऊस' देखील प्रदर्शित होत आहे. त्यामुळे प्रेक्षक कोणत्या चित्रपटाला प्रतिसाद देतात हे पाहण्यासारखं ठरेन.