पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'भूल भुलैया'चाही सीक्वल येणार

भूल भुलैया

बॉलिवूडमध्ये बायोपिक नंतर आता येणाऱ्या काळात सीक्वलचा ट्रेंड रुजू  होणार आहे. येणाऱ्या तीन वर्षांत अनेक चित्रपटांचे सीक्वल प्रदर्शित होणार आहेत. आता अक्षय कुमार, विद्या बालनचा सुपरहिट चित्रपट 'भूल भुलैया'चाही सीक्वल येणार असल्याची चर्चा आहे. या सीक्वलमध्ये  गोष्ट आणि स्टारकास्टही नवीन असणार असं समजत आहे. 

प्रियदर्शन यांनी 'भूल भुलैया'चं दिग्दर्शन  केलं होतं. आता चित्रपटाचा सीक्वल आणण्याचा  विचार भुषण करत आहे.  या चित्रपटासाठी कथा  फरहद सामजी लिहिणार आहे, तर चित्रपटामध्ये नवीन स्टार कास्टही पाहायला मिळणार आहे. चित्रपटाची कथा  लिहून पूर्ण झाल्यानंतरच  कलाकारांचा शोध घेण्यात येईल अशी माहिती  'मुंबई मिरर'नं दिली  आहे.  २००७ साली प्रदर्शित झालेला 'भूल भुलैया' हा चित्रपट रजनीकांत यांच्या  तमिळ चित्रपट 'चंद्रमुखी'चा रिमेक आहे. अक्षय कुमार, विद्या बालन, शायनी आहुजा, अमिशा पटेल यांची प्रमुख  भूमिका असलेला हा चित्रपट त्यावेळी सुपरहिट ठरला होता. 

अंधश्रद्धा आणि विज्ञान या दोघांची किनार या चित्रपटाला होती. अमेरिकेतलं सुशिक्षित जोडपं सुट्ट्या व्यतीत करण्यासाठी भारतातील आपल्या घरी परततं. या घरातील बंद खोलीत  भूतकाळातील कटु आठवणी बंद असतात. या आठवणीतून सुरू झालेला अंधश्रद्धेचा खेळ आणि त्यातून संपूर्ण कुटुंबाला बाहेर काढणार मानसोपचारतज्ज्ञ साधरण अशा कथेवर हा चित्रपट आधारलेला  होता. हॉरर कॉमेडी प्रकारातल्या या चित्रपटानं तेव्हा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली  आहे. आता सीक्वल  आला  तर त्यात कोणत्या कलाकारांची वर्णी लागेल हे पाहण्यासारखं ठरेन.