पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रजनीकांतनंतर अक्षय कुमारही दिसणार Man vs Wild मध्ये

अक्षय कुमार

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतनंतर अक्षय कुमारही 'मॅन वर्सेस वाईल्ड' या शोमध्ये दिसणार आहे. चित्रीकरणासाठी अक्षय बुधवारी सायंकाळी कर्नाटकात पोहोचला. 

चित्रीकरणासाठी Man Vs Wild च्या टीमनं भरले इतके शुल्क

बेयर ग्रिल्स गेल्या कित्येक वर्षांपासून हा शो करत आहेत.  अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सापडल्यानंतर त्यातून मार्ग कसा काढायचा, प्रतिकूल वातावरणात तग कसा धरायचा हे बेयर ग्रिल्स आपल्या शोमधून दाखवतो. या विशेष भागासाठी मंगळारीच बेयर ग्रिल्स  भारतात दाखल झाला होता. रजनीकांत यांच्यासोबत विशेष भागाचं चित्रीकरण पार पाडल्यानंतर आता या शोमध्ये अक्षय  कुमारही विशेष पाहुणा म्हणून उपस्थित आहे. 

रुग्णालयात दाखल असलेल्या दिग्दर्शकाच्या उपचारांचा खर्च अक्षयनं उचलला

'मॅन वर्सेस वाईल्ड'ची संपूर्ण टीम २८ ते ३० जानेवारीदरम्यान बांदीपुराच्या जंगलात चित्रीकरण करत आहे. आज या चित्रीकरणाचा शेवटचा दिवस आहे. अक्षय हा बॉलिवूडमधला सुपरस्टार म्हणून ओळखला जातो, त्याचबरोबर कठीण स्टंट आणि फिटनेसाठीही अक्षय प्रसिद्ध आहे. त्यामुळे बेयर आणि अक्षयची जोडी उत्तम जमेल असं म्हटलं जात आहे. 

'अतरंगी रे' मध्ये सारा अली खान दिसणार अक्षय कुमारसोबत