पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अक्षयच्या 'रावडी राठोड'चा सीक्वल येणार

अक्षय कुमार

बायोपिकनंतर आता बॉलिवूडमध्ये सीक्वलचा ट्रेंड रूजू होत आहे. येत्या आगामी काळात बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांचे सीक्वल येणार आहेत. या चित्रपटांच्या यादीत अक्षय कुमारच्या  'रावडी राठोड' या चित्रपटाचाही समावेश झाला आहे. 

'रावडी राठोड' चा सीक्वल येणार या चर्चांना  निर्मात्यांनीही दुजोरा दिल्याचं मुंबई मिररनं म्हटलं आहे. सध्या रावडी राठोडच्या कथेवर काम सुरू आहे. या चित्रपटामध्ये अक्षय प्रमुख भूमिकेत असेन असंही निर्माती शबीना खान हिनं  संबंधीत वृत्तपत्राला सांगितलं.  सध्या अक्षय 'हाऊसफुल  ४' च्या चित्रीकरणात व्यग्र आहे. याचबरोबर तो रोहित शेट्टीच्या 'सूर्यवंशी' चित्रपटातही दिसणार आहे.  या वर्षांत त्याचा 'गुड न्यूज' हा चित्रपटही प्रदर्शित होत आहे. 

अक्षयचं वेळापत्रक व्यग्र असताना काही दिवसांपूर्वी 'हेराफेरी ३' चीही घोषणा करण्यात आली. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता त्यामुळे चाहते 'हेराफेरी ३' ची वाट पाहत आहे. अक्षयचं हे व्यग्र वेळापत्रक पाहता 'रावडी राठोड'चं चित्रीकरण पुढील वर्षांत सुरू होईल असं म्हटलं जात आहे. अक्षयची निवड पक्की झाली असली तरी  चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून कोणाची वर्णी लागते हे पाहण्यासारखं ठरेन.